Sunday, June 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपोलिस पाटील संघटनांचा विधानसभेवर धडकणार महामोर्चा..

पोलिस पाटील संघटनांचा विधानसभेवर धडकणार महामोर्चा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील पोलिस पाटील संघटनांच्या वतीने येत्या,बुधवार १० डिसेंबर रोजी विधानसभेवर संयुक्त महामोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून पोलिस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.यासाठी सर्व पोलिस पाटलांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
३१ ऑगस्ट २०२४ रोजी नागपूर येथे राज्यस्तरीय पोलिस पाटील अधिवेशनात तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस पाटलांच्या सेवा व मागण्यांबाबत काही महत्त्वाच्या आणि सकारात्मक घोषणा केल्या होत्या.त्यामध्ये मुख्य म्हणजे पोलिस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्याची मागणी होती.मात्र,अजून पावेतो बऱ्याच प्रलंबित मागण्या असल्याने मोर्चा काढला जाणार आहे.मागण्यांमध्ये सर्व सेवानिवृत्त पोलिस पाटलांना सेवानिवृत्ती योजना लागू करणे,पदावर कार्यरत असतांना निधन झाल्यास वारसांना अनुकंपा नियुक्ती देणे आणि पोलिस पाटलांचा सन्मान वाढवण्यासाठी एसओपी योजना सुरू करण्याचा जाहीर घोषणा करण्यात आली होती.या घोषणांच्या वचनपूर्ततेसाठी दहा पोलिस पाटील संघटनांनी संयुक्तरित्या या महामोर्चाचे आयोजन विधानसभेवर केले आहे.त्या-त्या जिल्ह्यातील पोलिस पाटलांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन पोलिस पाटील संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ७७ हजार ६६६ चिमुकल्यांना पोलिओचा डोस..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात आज रविवारी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय 'पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला' नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पहिल्याच...

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-भरधाव वेगात असलेली अनियंत्रित वॅगनर कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरच्या मागील बाजूस जोरदार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील...

इसमाची गळफास घेऊन आत्महत्या; आरमोरी शहरातील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी शहरात एका ६५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज, रविवार २८ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस...

सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी शेतकऱ्यांना पोकरा योजनेतून पंप संचावर ९० टक्के तर पीव्हीसी पाइप संचावर १०० टक्के अनुदान.. – शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील निवड झालेल्या ५३२ गावांतील अनुसूचित जाती(SC)व अनुसूचित जमाती (ST)प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प(पोकरा)अंतर्गत सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!