Monday, August 31, 2026
Homeनागपूरकहाणीमध्ये ट्विस्ट; २५ वर्षीय प्रेयसीच निघाली प्रियकराची मारेकरी..

कहाणीमध्ये ट्विस्ट; २५ वर्षीय प्रेयसीच निघाली प्रियकराची मारेकरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :- गुरुवारच्या मध्यरात्री नागपूरच्या नंदनवन कॉलनीत किरायाने राहणारा २४ वर्षीय तरुण त्याच्या खोलीत मृत आढळला होता,तर तीथेच २५ वर्षीय प्रेयसी रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली होती.प्रियकराने चाकूने हल्ला करीत मला जखमी केले व नंतर स्वतः वर वार करत आत्महत्या केली,असा दावा प्रेयसीने केला होता.मात्र,तरुणाच्या शरीरावरील खोल जखमा पाहून हत्येचा प्रकार तर नाही ना,असा संशय पोलिसांना होता. पोलिसांकडून गुरुवार ४ डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.प्रेयसी बीएएमएसचे शिक्षण घेत असून,प्रियकर पोलिस भरतीची तयारी करीत होता.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.बालाजी कल्याणे वय २४ वर्षे,रा.मुदखेड,जि.नांदेड असे मृताचे नाव आहे.तर रती साहेबराव देशमुख वय २५ वर्षे,रा.करंजी,जि.नांदेड असे प्रेयसीचे नाव आहे.दोघेही नांदेडमधीलच रहिवासी आहेत.रती ही बीएएमएसची विद्यार्थिनी असून,ती इंटर्नशिप करीत आहे.तर बालाजी पोलिस भरतीची तयारी करीत होता.दोघांमध्येही चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते.बालाजी त्याच्या एका मित्रासोबत नंदनवन कॉलनीत किरायाने राहत होता.रतीदेखील जवळच राहत होती.बुधवारच्या रात्री ती बालाजीकडे गेली.रात्री एक वाजेपर्यंत बालाजी,रती व बालाजीचा मित्र या तिघांनीही गप्पा मारल्या.त्यानंतर मित्र दुसऱ्या खोलीत झोपायला गेला.रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास बालाजीच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज आला.मित्राने आवाज दिला असता रतीने काही मिनिटांनी दरवाजा उघडला. बालाजी रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडला होता व रतीचा हात तसेच शरीरावरदेखील जखमा होत्या.मित्राने लगेच घरमालकाला सांगितले.त्यांच्या मदतीने दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले.पण,डॉक्टरांनी बालाजीला मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि रतीची चौकशी केली. बालाजीने तिच्यावर हल्ला केला आणि नंतर स्वतःवरही हल्ला केला,असे तिने सांगितले.मात्र,पोलिसांना तिच्यावर संशय आल्याने तिची कसून चौकशी केली असता कहाणीमध्ये ट्विस्ट आला.पोलिसांच्या तपासात २५ वर्षीय प्रेयसीनेच प्रियकराची हत्या केल्याची बाब स्पष्ट झाली आहे.पोलिसांनी अखेर बालाजीचा भाऊ शिवाजी ऊर्फ ऋषीकेश विनायकराव कल्याणे याच्या तक्रारीवरून रतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
२४ वर्षीय बालाजी कल्याणे व २५ वर्षीय रती  देशमुख या दोघांमध्येही चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते.रती अनेकदा त्याच्या खोलीवर जायची. बुधवारी रात्री ती बालाजीकडे गेली.त्यांचा लग्न करण्याचा मानस होता. मात्र,रतीच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता.त्यामुळे बालाजी अगोदरच तणावात होता.बालाजीने हत्येच्या एक दिवस आधी  जर लग्न झाले नाही तर माझ्या मरणासाठीच तुम्हाला नागपूरला यावे लागेल,असे त्याने रतीच्या वडिलांना म्हटले होते.अश्यातच लग्नाच्या मुद्द्यावरूनच गुरुवारी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांचा वाद झाला आणि रतीने घरातील चाकू उचलून बालाजीच्या अंगावर पूर्ण ताकदीनिशी वार केले.त्यात तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला.त्याला त्या अवस्थेत पाहून ती घाबरली व तिनेदेखील स्वतःवर वार करून घेतले.सुरुवातीला तिने बालाजीनेच तिच्यावर हल्ला केला व नंतर स्वतःला मारून घेतल्याची बतावणी केली.मात्र,बालाजीच्या अंगावर खोलवर घाव होते व त्यातून पोलिसांचा संशय बळावला.तिची चौकशी केली असता सदरचा प्रकार समोर आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!