Wednesday, June 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता महागाई वाढीची चिन्हे; रुपयाची घसरण अन् डॉलरची वाढ..

आता महागाई वाढीची चिन्हे; रुपयाची घसरण अन् डॉलरची वाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-डॉलर हे जगातील सर्वात मोठे चलन आहे.जे बहुतेक व्यवहारांसाठी वापरले जाते.अश्यातच आज भारतीय रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे.अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने महत्त्वाचा ९० रुपयांचा टप्पा ओलांडला आणि आतापर्यंतचा नीचांक गाठला आहे.आज, बुधवार ३ डिसेंबरला एका अमेरिकी डॉलरची किंमत ९० रुपये २६ पैसे झाली आहे.समजा, तुम्ही विदेशात गेलात आणि तेथील चलन डॉलर असेल तर तुम्हाला काही वस्तू खरेदी करावयाच्या असतील तर तुम्हाला एका डॉलरसाठी ९० रुपयांपेक्षा अधिक किंमत मोजावी लागेल.व्यापार आणि पोर्टफोलिओमधील मंदीचा ओघ आणि भारत-अमेरिका व्यापार करारातील स्पष्टतेबद्दलच्या चिंतेमुळे चलनावर दबाव निर्माण झाला आहे.रुपयाच्या घसरणीचा तात्काळ परिणाम महागाई वाढीत होऊ शकतो.आपण परदेशातून आयात करत असलेल्या वस्तू अधिक महाग होतील,जसे की पेट्रोल,खते,सोने, इलेक्ट्रॉनिक्स आणि मशीनचे भाग. भारत मोठ्या प्रमाणात परदेशातून खाद्यतेल आणि डाळी आयात करतो. डॉलरच्या वाढीमुळे तेल आणि डाळींच्या किंमती वाढू शकतात, ज्यामुळे त्यांच्या किंमतीवर थेट परिणाम होईल.यामुळे तुमचे स्वयंपाकघर बजेट विस्कळीत होऊ शकते.शिवाय,परदेशी शिक्षण,प्रवास, डाळी,खाद्यतेल,कच्चे तेल,कम्प्युटर,लॅपटॉप,सोने,औषधे, रसायने,खते आणि आयात केलेली अवजड यंत्रसामग्री अधिक महाग होऊ शकते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!