Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीआष्टी शहराच्या छत्रपती शिवाजी चौक परिसरात स्पीड ब्रेकर बसविण्याची ग्रामस्थांची मागणी..

आष्टी शहराच्या छत्रपती शिवाजी चौक परिसरात स्पीड ब्रेकर बसविण्याची ग्रामस्थांची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहराच्या छत्रपती शिवाजी चौक परिसरात स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी आष्टी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन,पोलीस प्रशासन व संबंधित विभागाकडे केली आहे.आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.अनेक वाहनचालक सुसाट वेगाने वाहने पळवित असतात.येथील मार्गावरून शालेय विद्यार्थी,पादचारी,सायकलस्वार तसेच दाट वस्तीचा भाग असल्याने या परिसरात अपघाताचा धोका वाढला आहे. अलीकडच्या काळात या परिसरात काही किरकोळ अपघातही घडले आहेत,भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये,यासाठी छत्रपती शिवाजी चौक येथे स्पीड ब्रेकर बसविणे अत्यावश्यक झाले आहे.त्यामुळे वाहतूक विभागाशी समन्वय साधून तातडीने स्पीड ब्रेकर उभारण्याची मागणी आष्टी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत आष्टी ग्रामपंचायतीच्या सरपंचा बेबीताई बुरांडे व आष्टी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन सादर करतेवेळी आनंद कांबळे,आशिष क्षिरसागर,रत्नाकर गोटमुकुलवार,सिद्धार्थ जिल्हेकर, आकाश हिंगाणे,तुषार येलमुले सह आष्टी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!