Sunday, April 19, 2026
Homeब्रम्हपुरीअवैध दारूसाठा प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; पाच लाखाच्यावर दारूसाठा जप्त..

अवैध दारूसाठा प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; पाच लाखाच्यावर दारूसाठा जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतांनाच अवैध दारूसाठा प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत ब्रम्हपुरी तालुक्याच्या उदापूर येथून एकास अटक करून तब्बल ५ लाख १६ हजार २८० रुपयांचा देशी,विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.यात विदेशी दारू- दोन लिटर क्षमतेच्या ११ बॉटल,१८० मिली क्षमतेच्या १ हजार ९२७ बॉटल,९० मिली क्षमतेच्या २२५ बॉटल तर देशी दारूच्या ९० मिली क्षमतेच्या २०० बॉटलचा समावेश आहे.अवैध दारूसाठा प्रकरणी उदापूर येथील ज्ञानेश्वर रामकृष्ण नाकतोडे यास ताब्यात घेण्यात आले आहे.
सध्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत.१ डिसेंबर पर्यंत प्रचार सुरू असणार आहे आणि नंतर दुसऱ्याच दिवशी मतदान पार पडणार आहे. अश्यातच काही ठिकाणी तळीरामांसाठी खास मेजवानी म्हणून देशी-विदेशी दारूची तजवीज करून ठेवली जात आहे.पण,चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी १ डिसेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अवैध दारू बंदी लागू केली आहे.त्यातच ब्रम्हपुरी तालुक्याच्या उदापूर येथे अवैध दारूसाठा असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग नागपूर व राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूरच्या पथकास मिळताच धाडसत्र राबविले. यात काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पथकाने आरोपीच्या घरी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा आढळून आला.सदरची कारवाई नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त गणेश पाटील व चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सोमेश्वर गव्हारे यांच्या नेतृत्वाखाली पथकातील सुजित चिकाटे,संजय कुमार हरिणखेडे,सुकेशनी कारेकार यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!