Saturday, September 5, 2026
Homeब्रम्हपुरीब्रम्हपुरीच्या इथेनॉल कंपनी विरोधात गावकरी एकवटले..

ब्रम्हपुरीच्या इथेनॉल कंपनी विरोधात गावकरी एकवटले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उदापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या बोरगाव मार्गावरील रामदेव बाबा सॉलवंट कंपनीच्या डिस्टिलेशन प्लांटला बुधवार १९ नोव्हेंबरच्या सायंकाळी टेस्टिंग दरम्यान अचानक भीषण आग लागून मोठा स्फोट झाला होता.आग आणि धुराचे मोठे लोट तसेच उंच उसळणाऱ्या ज्वालांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.आग नियंत्रणात आणण्यासाठी ब्रम्हपुरी,नागभीड,सिंदेवाही व मूल येथील अग्निशमन दल,त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील दोन फायर ब्रिगेड तसेच देसाईगंज येथील पथकानेही तातडीने मदतकार्य सुरू केले.तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या दोन फायर टेंडर फोम सोल्यूशनसह घटनास्थळी रवाना करण्यात आल्याने रात्री ८ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते.अश्यातच कंपनीत झालेल्या स्फोटामुळे परिसरातील विशेष करून उदापूर गावातील नागरिक भयभीत होऊन सैरभैर झाले होते.स्फोटाने गाव परिसर दणाणून गेल्याने संतप्त गावकरी २४ नोव्हेंबरला एकत्र येत शेकडो नागरिकांनी इथेनॉल कंपनी परिसरात जाऊन जोरदार नारेबाजी केली. इथेनॉल प्लान्ट जवळ असलेल्या उदापूर येथील ग्रामस्थांना टेस्टिंगचा त्रास सहन करावा लागत आहे.भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने परिसरातील इथेनॉल कंपनी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!