Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे रेल्वे गाडीच्या धडकेत एक इसम ठार..

देसाईगंज येथे रेल्वे गाडीच्या धडकेत एक इसम ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या रेल्वे स्थानकापासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावरील चुना भट्टी नजिक रेल्वे क्रॉसिंग करतांना एका ३८ वर्षीय इसमाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.अपघातात रोशन सहारे रा.रावनवाडी (बोळधा-कोरेगाव),जि.गडचिरोली असे मृत पावलेल्या इसमाचे नाव असून रोशन हा मूकबधिर(मुका,बहिरा) होता.तसेच तो देसाईगंज नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून काम करायचा.
घटनेच्या वेळी रोशन हा त्याची सायकल घेऊन चुना भट्टी नजिक असलेली रेल्वे पटरी ओलांडून गांधी वॉर्ड परिसरात जाण्याच्या तयारीत असतांनाच चंद्रपूरहून येणाऱ्या कोरबा एक्स्प्रेसने त्याच्या सायकलला जोरदार धडक दिली.यात त्याचे संतुलन बिघडले आणि डोक्याला जबर मार लागून खाली कोसळताच रोशनचा जागीच मृत्यू झाला.घटना घडताच जवळच असलेल्या नागरिकांनी धाव घेतली व घटनेची माहिती रेल्वे प्रशासन तसेच देसाईगंज पोलिसांना देण्यात आली.घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी असून पुढील प्रक्रिया पार पाडणे सुरू होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!