Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरशालार्थ आयडी घोटाळ्याचे 'पिक्चर अभी बाकी है' ; तीन लीपिकांना बेड्या.. -...

शालार्थ आयडी घोटाळ्याचे ‘पिक्चर अभी बाकी है’ ; तीन लीपिकांना बेड्या.. – आता अटकेतील एकूण आरोपींची संख्या चोवीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याचे ‘पिक्चर अभी बाकी है’,असे चित्र दिसून येत आहे.शांत होऊ घातलेला घोटाळा आणखी तग धरू लागला आहे. विशेष म्हणजे,घोटाळ्याचा तपास आता राज्यपातळीवरील विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. अश्यातच तपासादरम्यान तीन कनिष्ठ लिपिकांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक,शिक्षणाधिकारी व तत्कालीन शिक्षण उपसंचालकांशी संगनमत करून बनावट शालार्थ आयडी तयार करून नोकरी मिळविली. त्यानंतर वेतन घेत त्यांनी शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे उघड होताच सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने बऱ्याच दिवसांनी कारवाई करत तीन कनिष्ठ लिपिकांना अटक केली आहे.यात भांडेवाडीतील जगन्नाथ पब्लिक स्कूलमधील ३५ वर्षीय कनिष्ठ लिपीक यशवंत धकाते (विणकर वसाहत,मानेवाडा बेसा मार्ग),चरणदास प्रायमरी शाळेतील ३५ वर्षीय कनिष्ठ लिपीक जगदीश दिनकरराव ढेंगे(मंगलदीपनगर, मानेवाडा बेसा मार्ग),व वाठोडा ले आऊटमधील विद्या विकास उच्च प्राथमिक शाळेतील ३१ कनिष्ठ लिपीक अक्षय संजय मांडे (भगवाननगर,बैंक कॉलनी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना काल बुधवारी अटक केली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यातील अटकेतील एकूण आरोपींची संख्या आता २४ इतकी झाली आहे.यात ३ शिक्षण उपसंचालक,३ शिक्षणाधिकारी,१ वेतन अधीक्षक,३ मुख्याध्यापक,२ शाळा संचालक,३ सहाय्यक शिक्षक,६ लिपीक व ३ कनिष्ठ लिपिकांचा समावेश आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!