Tuesday, September 1, 2026
Homeचंद्रपूरब्रम्हपुरीच्या डिस्टिलेशन प्लांटला भीषण आग..

ब्रम्हपुरीच्या डिस्टिलेशन प्लांटला भीषण आग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-सव्वा लाख लिटर इथेनॉलचा साठा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी परिसरातील रामदेव बाबा सॉलवंट कंपनीच्या डिस्टिलेशन प्लांटला आज,बुधवार १९ नोव्हेंबरच्या सायंकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.आगीने रौद्ररूप धारण केल्याने अनेकांची तारांबळ उडाली.डिस्टिलेशन प्लांटमध्ये लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी बऱ्याच तासांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.अश्यातच सावधगिरीचा उपाय म्हणून नागरीकांची वर्दळ बंद करण्यात आली आहे.आग आणि धुराचे मोठे लोट तसेच उंच उसळणाऱ्या ज्वालांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आग कश्यामुळे लागली अद्याप स्पष्ट झाले नाही.घटनास्थळावरील स्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष घालून आहे.सध्याच्या घडीला जीवितहानी झालेली नसून आग आटोक्यात आणण्यासाठी ब्रम्हपुरी,नागभीड, सिंदेवाही व मूल येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील दोन फायर ब्रिगेड तसेच देसाईगंज येथील पथकानेही तातडीने मदतकार्य सुरू केले आहे.तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या दोन फायर टेंडर फोम सोल्यूशनसह घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!