Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीव्यवहार न झालेल्या निष्क्रिय बँक खात्यांमध्ये ३९ कोटींपेक्षा जास्त रक्कम पडून.. -...

व्यवहार न झालेल्या निष्क्रिय बँक खात्यांमध्ये ३९ कोटींपेक्षा जास्त रक्कम पडून.. – ३१ डिसेंबरपर्यंत दावा करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गेल्या १० वर्षांपासून व्यवहार न झालेल्या निष्क्रिय बँक खात्यांमधील ठेवी रकमेचा लाभ आता पुन्हा खातेदारांना मिळू शकतो.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार अशा ठेवी “ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी” मध्ये हस्तांतरित केल्या जातात,परंतु त्या कायमस्वरूपी गमावल्या जात नाहीत.ठेवीदारांना योग्य अर्ज आणि केवायसी कागदपत्रांद्वारे आपले पैसे परत मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील विविध बँकांमधील १ लाख २१ हजार ५४ खात्यांमध्ये एकूण ३९ कोटी ४४ लाख रुपयांची रक्कम अशी निष्क्रिय ठेवी म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निधी खात्यात नोंद आहे.ही रक्कम संबंधित खातेधारकांनी सहजपणे आपल्या बँकेत संपर्क करून परत मिळवता येऊ शकते.आतापर्यंत २५८ नागरिकांनी दावा करून २.२२ कोटी रुपये परत मिळवले असून इतर सर्व ठेवीदारांनीही तातडीने आपली प्रक्रिया सुरू करावी,असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात ७ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँकांच्या सहभागातून एक दिवसीय जनजागृती शिबिर घेण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केवायसी अद्ययावत करून आणि ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी दावा नोंदविण्याचे व आपल्या जुन्या बँक खात्यांची पडताळणी करून ही रक्कम परत मिळवावी,असे आवाहन अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत धोंगळे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!