- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या काळात व्हीव्हीपॅट(व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल)मशीनचा वापर करण्यास मुभा दिली होती.त्यानुसार,इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन(EVM) आणि ज्या मतदारांनी ज्यांना मतदान केले अशी पावती दिसणारी मतदार पडताळणी कागद ऑडिट ट्रायल मशीनचा(व्हीव्हीपॅट)वापर करण्यात आला होता. अश्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्याने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. सदरची याचिका ही काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी दाखल केली असून याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला या याचिकेवर पुढील आठवड्यापर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशिन वापरली नाही,तर निवडणुका मतपत्रिकांद्वारे घेण्यात याव्यात, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.मतदाराला आपले मत व्यवस्थित नोंदवले गेले की नाही,हे तपासण्यासाठी व्हीव्हीपॅट मशिन आवश्यक आहे. त्याचबरोबर,मतदार पडताळणी कागद ऑडिट ट्रायल मशीन(व्हीव्हीपॅट)पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे.तसेच आगामी निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे.काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी ॲड.पवन दहात आणि ॲड.निहाल सिंग राठोड यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
- Advertisement -

