Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरपाहतात तो काय? शरीरावर नखांच्या खोल जखमा आणि एका हाताचा भाग खाल्लेला..!

पाहतात तो काय? शरीरावर नखांच्या खोल जखमा आणि एका हाताचा भाग खाल्लेला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यात एक भयावह घटना उघडकीस आली आहे.दुपारच्या सुमारास शेतावर गेलेला शेतकरी सायंकाळ होऊनही घरी परतला नसल्याने गावकरी व वन विभागाच्या पथकाने शोध घेतला असता तब्बल ५०० मीटर अंतरावर वाघाने फरफटत नेऊन पाहतात तो काय?शरीरावर वाघाच्या नखांच्या खोल जखमा आणि एका हाताचा भाग खाल्लेला आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.ईश्वर भरडे वय ५२ वर्षे, रा.शंकरपूर, ता.चिमूर,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.सदरची घटना काल बुधवारी शंकरपूर-आंबोली मार्गावरील ठाणा रीट परिसरातील शेतशिवारात सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.प्रकरणी गावकऱ्यांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
ईश्वर भरडे यांच्या शेतात कापसाच्या पिकाची लागवड करण्यात आली आहे.त्यामुळे काल बुधवारी दुपारच्या सुमारास कापसाचे पीक पाहण्यासाठी सायकलने एकटेच शेतावर गेले होते.सायंकाळ होऊनही ते घरी परतले नसल्याने कुटूंबीय तसेच काही नागरिकांनी
शेतावर जाऊन पाहणी केली असता त्यांची सायकल शेताजवळ दिसून आली.ईश्वर यांना आवाज दिला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे संशय निर्माण झाला.लागलीच सायंकाळी गावातील युवक तसेच  वनविभागाचे कर्मचारी मिळून शोध घेऊ लागले असता शेतात रक्ताचे डाग आणि फाटलेले कपडे आढळल्याने सर्वजण त्या दिशेने गेले.तब्बल अर्धा किलोमीटर अंतरावर थोड्या ईश्वर भरडे यांचा मृतदेह दिसून आला.पाहतात तो काय?  त्यांच्या शरीरावर वाघाच्या नखांच्या खोल जखमा आणि एका हाताचा भाग खाल्लेला आढळून आला.प्रकरणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.महत्वाचे म्हणजे,एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३८ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३६ वा बळी असल्याने यावर सरकारने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!