- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्याची मालिका संपता संपेना.अश्यातच आता एक भयावह घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी गावनजिकच्या शेतशिवार परिसरात आज,रविवार १९ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.चराई करणाऱ्या बैलांना सायंकाळच्या सुमारास परत आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास वाघाने ठार तर केलेच,पण शेतकऱ्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे केल्याचे दृश्य पाहून सर्वत्र एकच खळबळ माजली. भाऊजी पाल वय ५५ वर्षे,रा.चेकपिपरी, ता.गोंडपिपरी,जि.चंद्रपूर असे वाघाने ठार केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.चेकपिपरी गावातील शेतकरी भाऊजी पाल हे नेहमीप्रमाणे काल शनिवारी सकाळच्या सुमारास घरच्या बैलांना चराईसाठी घेऊन शेतावर गेले आणि बैलांना चारण्यासाठी मोकळे सोडून घरी परतले होते.परत सायंकाळी ते पुन्हा बैलांना घरी आणण्यासाठी शेताकडे गेले होते.मात्र,रात्र होऊनही ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली.पण त्यांचा कुठेही थांगपत्ता लागलेला नव्हता. त्यामुळे आज सकाळच्या सुमारास कुटुंबीयांनी ग्रामस्थांसह शोधमोहीम राबवली असता शेतशिवार परिसरात भयावह दृश्य दिसून आले.शेतकऱ्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे विविध ठिकाणी विखुरलेले अवस्थेत सापडले.दृश्य पाहून अनेकजण अवाक् झाले.वाघाने शरीराचे तुकडे-तुकडे केल्याच्या प्रकाराने वनविभागाचे अधिकारीसुद्धा स्तब्ध झाले आहेत.
- Advertisement -

