Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संपूर्ण जागा पूर्ण ताकदिने लढवू-...

देसाईगंज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संपूर्ण जागा पूर्ण ताकदिने लढवू- राकाँचे तालुकाध्यक्ष क्षितिज उके

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-येत्या पुढील काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा(शरदचंद्र पवार गट)झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही; त्यामुळे देसाईगंज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संपूर्ण जागा पूर्ण ताकदिने लढवू,अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके यांनी स्पष्ट केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष,जिल्हा पदाधिकारी तसेच कार्यर्त्यांची नुकतीच देसाईगंज शहराच्या विश्रामगृहात आगामी निवडणुका संदर्भात बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.
राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात केवळ दोनच पक्ष जिवंत आहेत की काय? असे दिसून येत आहे.राज्य स्तरापासून ते स्थानिक स्तरापर्यंतची कुठलीही निवडणूक असो भाजप आणि काँग्रेसचा ‘मी पणा ‘ दिसून येतो.त्यामुळे अश्यांना त्यांची जागा दाखविणे आवश्यक आहे.असेही क्षितिज उके म्हणाले.नुकतेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. देसाईगंज तालुक्यातील पंचायत समितीचे घोषित करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार कोरेगाव- सर्वसाधारण, डोंगरगाव(हलबी)-अनुसूचित जमाती महिला,विसोरा-सर्वसाधारण,सावंगी- सर्वसाधारण महिला,कुरूड- अनुसूचित जाती महिला तर कोकडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.तर जिल्हा परिषद क्षेत्राकरिता कोरेगाव-डोंगरगाव(हलबी)- नागरिकांचा मागास प्रवर्ग, विसोरा-सांवगी- नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला तर कुरुड-कोकडी-सर्वसाधारण आरक्षण सोडत निघाली आहे. अश्यातच देसाईगंज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संपूर्ण गटातील जागा शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष क्षितिज उके यांनी लढविण्याची तयारी दर्शविल्याने तालुक्याच्या राजकारणात यंदा नवे समीकरण पहावयास मिळणार आहे.त्यामुळे यंदाचा बाजिगर ‘जनशक्ती की धनशक्ती’ हे सांगणे अवघड आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!