Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरमुलाने आई म्हणून हाक मारली; पण ती उठलीच नाही.. - शेवटी पोलिसांना...

मुलाने आई म्हणून हाक मारली; पण ती उठलीच नाही.. – शेवटी पोलिसांना केले पाचारण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मुलगा आणि सून तीन दिवसांपूर्वी काही कामानिमित्त मुंबईला गेले होते.मुंबईहून आज शुक्रवारी दोघेही घरी परतले असता,घराचा दार उघडा दिसला. मुलाने आई म्हणून हाक मारली; पण ती उठलीच नाही. त्यामुळे तो आत गेल्यावर घरातील हॉलमध्ये बेडवर आई झोपलेली आढळून आली.त्याने तिला उठविण्याचा प्रयत्न केला,पण ती निपचित पडलेली होती आणि तिचा हात थंडगार असल्याचे आढळून आले.त्यानंतर बघतोय तर काय ती मृतावस्थेत असल्याची माहिती समोर आली. प्रकरणी मुलाने पोलिसांना पाचारण केल्याची घटना आज,शुक्रवार १० ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहराच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेनापतीनगरात उघडकीस आली.सुनीता भोयर वय ५५ वर्षे, रा.सेनापतीनगर,नागपूर असे मृतावस्थेत आढळून आलेल्या महिलेचे नाव असून पती काही वर्षांपूर्वी मरण पावल्याने ती मुलगा आणि सुनेसह सेनापतीनगरात राहते.मंगळवार ७ ऑक्टोंबर २०२५ रोजी मुलगा आणि सून काही कामानिमित्त मुंबईला गेले होते.त्यामुळे सुनीता या एकट्याच घरी होत्या.आज शुक्रवारी मुलगा आणि सून घरी परतल्या असता सुनीता ह्या घरातील हॉलमध्ये बेडवर निपचित पडून मृत आढळून आल्याने मुलाने वाठोडा पोलिसांना माहिती दिली.त्यानुसार वाठोडा पोलीस ठाण्याचे एपीआय संतोष सपाटे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.उत्तरीय तपासणी अहवालावरून प्रकरणाचा खुलासा होणार आहे.तत्पूर्वी प्राथमिक तपासणीत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!