Tuesday, September 1, 2026
Homeमुंबईआता ग्रीन स्टील उद्योगांसाठी धोरण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता ग्रीन स्टील उद्योगांसाठी धोरण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-सौर पॅनेल निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडी घेत असून,या क्षेत्रामध्ये होत असलेल्या भरीव कामामुळे एक मोठी ‘ग्रीन इकोसिस्टीम’ निर्माण होणार आहे.तसेच ग्रीन स्टील हे नवीन क्षेत्र असल्याने या ग्रीन स्टील संदर्भात धोरण तयार करण्यासाठी एका समितीचे गठण करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची १३ वी बैठक आज,सोमवार ६ ऑक्टोंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार,उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगास सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत मोठे विशाल व अतिविशाल उद्योगांना प्रथम्याने निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.जागतिक कर संरचनेच्या बदलामुळे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील वस्त्रोद्योग उद्योगावर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर विद्युत शुल्क सवलतीची औद्योगिक अनुदानातून वजावट केली जाणार नाही.तसेच विदर्भ,मराठवाडा या वर्गीकृत क्षेत्राकरिता कॅप्टीव्ह प्रोसेस व्हेंडर संदर्भातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे वर्गीकरण “अ”  व “क” वर्गीकृत तालुका क्षेत्रात करण्यात आले असल्याने खेड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.व खेड डेव्हलपर्स लि.यांना “क” वर्गीकृत तालुक्याचे फायदे लागू करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ उपसमितीत घेण्यात आला.मे.ओपी मोबिलीटी एक्सटेरिअर इंडिया प्रा.लि.या कंपनीत ९० टक्के महिला कार्यरत असून या कंपनीने पुणे जिल्ह्यातील कामगारांना रोजगार मिळवून दिला आहे.त्यामुळे या कंपनीस मोठ्या प्रकल्पांचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ उपसमितीत घेण्यात आला.त्याचबरोबर,थ्रस्ट सेक्टर धोरणांतर्गत प्रकल्पांना प्रोत्साहन देय करण्यासंदर्भात ग्रीन स्टील संदर्भात नियुक्त होणाऱ्या समितीने विचार करावा,असेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.या बैठकीस मुख्य सचिव राजेशकुमार,अतिरिक्त मुख्य सचिव(वित्त)ओ.पी.गुप्ता,अतिरिक्त मुख्य सचिन (नगरविकास)असिमकुमार गुप्ता,अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा)आभा शुक्ला,प्रधान सचिव(नियोजन)सौरभ विजय,सचिव(उद्योग)डॉ.पी.अन्बळगन,सचिव (वस्त्रोद्योग)अंशू सिन्हा,एम.आय.डी.सी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासु उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!