Tuesday, September 1, 2026
Homeचंद्रपूरपोलिसांची धडक कारवाई; आरोपीसह २६ लाखाच्यावर किंमतीचा एम.डी ड्रग्ज पावडर जप्त..

पोलिसांची धडक कारवाई; आरोपीसह २६ लाखाच्यावर किंमतीचा एम.डी ड्रग्ज पावडर जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-चंद्रपुरात एम.डी.(MEPHEDRONE)ड्रग्ज पावडर विक्रीसाठी आणले जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून एका आरोपीसह ५२८ ग्रॅम एम.डी ड्रग्ज पावडर(प्रति ग्रॅम दर ५ हजार रुपये)एकूण किंमत २६ लाख ४० हजार,मोबाईल फोन,रोकड,आणि कार असा एकूण ३५ लाख ७ हजार ४८० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.प्रकरणी वसीम इमदाद खान वय ३७ वर्षे रा.बैगनवाडी,साईबाबा मंदिराजवळ, गोवंडी,मुंबई यास अटक करून गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन पडोली, चंद्रपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसीम  खान हा एम.डी.ड्रग्ज पावडर विक्रीसाठी चंद्रपूरकडे येत असल्याची माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे पथकास मिळाली होती.त्यानुसार नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील साखरवाही फाटा, एच.पी.पेट्रोल पंपासमोर सापळा रचण्यात आला.काही वेळातच आरोपी त्याच्या एमएच-१० ईक्यू-०४२१ क्रमांकाच्या कारने सापळा रचलेल्या घटनास्थळी दाखल होताच पोलिसांनी झाडाझडती घेत कारवाई केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!