Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीफुलनार जंगल परिसरातील नक्षल चकमकीची दंडाधिकारीय चौकशी..

फुलनार जंगल परिसरातील नक्षल चकमकीची दंडाधिकारीय चौकशी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पोलीस स्टेशन कोठी,पोलीस उपविभाग भामरागड अंतर्गत मौजा फुलनार जंगल परिसरात  २७ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या पोलीस व नक्षल चकमकीदरम्यान चार नक्षलवादी (एक पुरुष व तीन महिला)ठार झाले होते.घटनास्थळी शस्त्रसज्ज अवस्थेत हे मृतदेह आढळून आल्याने सदर घटनेचे कारण आणि पार्श्वभूमी शोधण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९६ अन्वये दंडाधिकारीय चौकशी करण्यात येत आहे.सदरची चौकशी उपविभागीय दंडाधिकारी एटापल्ली अमर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येत आहे.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या, घटनेदरम्यान उपस्थित असणाऱ्या किंवा या संदर्भात काही अनुभव अथवा पुरावे असणाऱ्या नागरिकांनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह १५ दिवसांच्या आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत उपविभागीय दंडाधिकारी एटापल्ली यांच्या कार्यालयात जमा करावे.
नागरिकांनी आपल्या निवेदनात घटनेचे स्वतः पाहिल्याप्रमाणे वर्णन,घटनेपूर्व किंवा घटनेनंतर घडलेल्या संबंधित घटना,त्या संदर्भातील अनुभव, शासकीय यंत्रणेचा सहभाग किंवा प्रतिक्रिया याविषयीची माहिती तसेच इतर कोणतीही संबंधित माहिती समाविष्ट करावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!