- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-काँग्रेस पक्षाचे नेते तथा देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना केरळ राज्यातील भाजप प्रवक्ते पिंटू महादेव यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या संतापजनक घटनेचा देसाईगंज काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करत वक्तव्याविरोधात आज,रविवार ५ ऑक्टोंबरला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
आमदार मसराम म्हणाले, “राहुल गांधी हे देशाच्या संविधानाचे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी लढणारे धैर्यवान नेते आहेत.अशा नेत्याला धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.ही धमकी केवळ एका व्यक्तीवर नसून संपूर्ण लोकशाहीवर आहे. राहुल गांधींनी “भारत जोडो यात्रा” व “भारत न्याय यात्रा” द्वारे देशात प्रेम,समानता आणि बंधुतेचा संदेश दिला.या प्रवासात त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळेच काही असहिष्णु विचारसरणीचे लोक चिडून अशा धमक्या देत आहेत.ही प्रवृत्ती रोखली नाही तर देशात लोकशाही धोक्यात येईल,असेही आमदार मसराम म्हणाले.प्रसंगी उपस्थित काँग्रेस नेत्यांनी,संबंधित भाजप प्रवक्त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक केली नाही,तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल,असेही स्पष्ट केले.
तक्रार दाखल करतेवेळी काँग्रेसचे युवा विधानसभाध्यक्ष कमलेश बारस्कर,युवक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष अमर भर्रे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर निमजे,माजी जिल्हा परिषद सदस्य ममता पेंदाम,विलास बनसोड,काँग्रेसचे देसाईगंज शहराध्यक्ष विजय पिल्लेवान,ओबीसी काँग्रेस सेल तालुकाध्यक्ष कैलास वानखेडे,सागर वाढई,जावेद शेख, जुमनाके, आरती लहरी,रजनी आत्राम,अरुण कुंभलवार,संदीप वाघाडे,परशुराम ठाकरे,जितेंद्र चौधरी, विकास प्रधान, गुलाब नंदेश्वर,मडावी विसोरा,धनपाल आदे,अमर बगमारे,साजन मेश्राम,पवन गेडाम तसेच जिल्हा काँग्रेस कमिटी,युवक काँग्रेस,महिला काँग्रेस,सेवा दल,एनएसयूआय आदींचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांनी “राहुल गांधी अमर रहें”, “लोकशाही जिंदाबाद”, “भाजपचा निषेध असो” अशा घोषणा देत निषेध नोंदवला.घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून धमकीचा तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे.
- Advertisement -

