चंद्रपूर :-मध्यरात्रीच्या सुमारास दोन दुकानांचे शटर तोडून १६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांपैकी दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात भिसी पोलिसांना यश आले आहे.यातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.चिमूर तालुक्यातील भिसी शहरात ३ ऑक्टोंबर २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शनिवार पेठ, भिसी येथील राकेश विजय खोब्रागडे दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करून काउंटरमधील ७ हजार ३०० रुपये चोरी केले.त्याच वेळी शेजारील श्रीकांत सोहनलाल ठोंबरे यांच्या मालकीच्या “शरण्या इलेक्ट्रिकल्स” दुकानाचे सुद्धा लॉक तोडून,आत प्रवेश करत तीन नग टेबल फॅन(किंमत ७ हजार ५००)आणि रोख १ हजार ५०० रुपये असा एकूण १६ हजार ३०० चा मुद्देमाल चोरीला गेला होता.त्यानुसार,राकेश विजय खोब्रागडे यांनी भिसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.अश्यातच ४ ऑक्टोंबरच्या रात्री गावातील काही नागरिकांना प्रज्वल उर्फ नागेश वामण तुबेकर याला संशयास्पदरीत्या भटकतांना पाहिले. त्यास थांबवून विचारपूस करण्यात आली असता,त्याच वेळी पोलीस स्टेशन भिसीचे पेट्रोलिंग स्टाफ घटनास्थळी दाखल झाले आणि संशयिताला ताब्यात घेतले.सखोल चौकशीत त्याने तसेच त्याचे साथीदार दीपक संजय छापेंकर आणि आयुष उर्फ गट्टू खोब्रागडे यांनी मिळून ही चोरी केल्याची कबुली दिली.त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी दीपक छापेंकरला अटक केली,तर तिसरा आरोपी आयुष खोब्रागडे सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले असून शोधमोहीम सुरू आहे.
दुकानफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक; एक फरार..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

