Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरसोनोग्राफी सेंटरमध्ये बालविवाहाचे बिंग फुटले; अल्पवयीन मुलगी गर्भवती.. - सहा जणांवर गुन्हे...

सोनोग्राफी सेंटरमध्ये बालविवाहाचे बिंग फुटले; अल्पवयीन मुलगी गर्भवती.. – सहा जणांवर गुन्हे दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-वयाची खात्री न करता एका मध्यस्थीच्या मार्फतीने अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्यात आले. विवाह पश्चात अल्पवयीन मुलगी पतीकडे राहू लागली. अश्यातच गर्भवती राहिल्याने पतीने तिला तपासणीकरिता सोनोग्राफी सेंटरमध्ये नेले.तपासणी करीत असतांना मुलीच्या वयाबाबत डॉक्टरला शंका आली.त्यानुसार आधारकार्ड तपासले असता आधारकार्डवरून मुलगी ही केवळ १७ वर्षे १० महिन्यांची असल्याचे डॉक्टरच्या लक्षात आले आणि बालविवाहाचे बिंग फुटल्याची धक्कादायक घटना उमरेड येथील सोनोग्राफी सेंटरमध्ये उघडकीस आली असून प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात पती,मुलाचे आई-वडील,मुलीचे आई-वडील व एका मध्यस्थीवर पोलिस उपनिरीक्षक अशोक ठाकूर यांच्या तक्रारीवरून बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ सहकलम ४,८,१२ व पोस्कोअंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी पतीस अटक करण्यात आली आहे,तर उर्वरित आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी म्हटले आहे.पीडित अल्पवयीन मुलगी तपासणी अंती १९ आठवड्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले आहे.
मुलगा नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील असून पीडित अल्पवयीन मुलगी ही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.६ एप्रिल २०२५ रोजी पीडित मुलगी १७ वर्षे वयाची असतांना एका मध्यस्थीमार्फत आईवडिलांनी तिचा विवाह भिवापूर तालुक्यातील मुलाशी लावून दिला. विवाहापश्चात अल्पवयीन मुलगी पतीकडे राहू लागली. गत दोन दिवसांपूर्वी पतीने तिला उमरेड येथील सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणीकरिता नेले.दरम्यान, आधारकार्डवरून पीडित मुलगी ही १७ वर्षे १० महिन्यांची असल्याचे डॉक्टरच्या लक्षात आले.तपासणी केली असता ती १९ आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.डॉक्टरांनी लागलीच याबाबत भिवापूर पोलिसांना कळविले.दरम्यान,पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यामार्फत पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बालविवाह पश्चात गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!