Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींची ई-केवायसीची तांत्रिक अडचण होणार दूर..!

लाडक्या बहिणींची ई-केवायसीची तांत्रिक अडचण होणार दूर..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेतील बोगस लाभार्थींचा शोध घेऊन अश्यांचे लाभ बंद करण्यासाठी दरवर्षी जून महिन्यात ई-केवायसी करावी लागणार आहे.सध्या स्थितीत ई-केवायसी करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केल्याने लाभार्थी महिला ई-केवायसीसाठी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटचा वापर करू पाहत असतांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊन पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.अश्यातच आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून,तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच तांत्रिक अडचण दूर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.प्रक्रियेत केवळ लाभार्थी महिलेचीच नव्हे,तर तिच्यासोबत पती किंवा वडिलांची ई-केवायसी करणेही अनिवार्य आहे.लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न तसेच तिच्या पतीचे किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न शोधले जाईल.महिलेचे लग्न झाले असेल तर तिच्या पतीचे आणि लग्न झाले नसेल तर वडिलांचे उत्पन्न तपासले जाणार आहे.ई-केवायसी करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जावे,साईटवर गेल्यानंतर महिलांनी प्रथम आपला आधार क्रमांक टाकावा,आधार क्रमांकानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकावा,त्यानंतर खालील सूचना वाचून ओके बटनावर क्लिक करावे,त्यानंतर आलेला ६ अंकी कोड(ओटीपी)प्रविष्ट करावा,सदरचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर महिलांना त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल,आधार क्रमांकानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकावा,त्यानंतर खालील सूचना वाचून ओकेच्या बटनावर क्लिक करावे.त्यानंतर आलेला ६ अंकी कोड प्रविष्ट करावा,अखेरच्या टप्प्यात कुटुंब प्रमुखाला १)माझ्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीस नाही किंवा निवृत्तीवेतनाचा लाभ घेत नाही,२) माझ्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे,या प्रश्नांची होय किंवा नाही अशा स्वरुपात उत्तरे द्यावी लागतील.त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे,अशा प्रकारे तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!