Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअभिनंदन महाराष्ट्र सरकार,भ्रष्टाचारात जोरदार प्रगती -विजय वडेट्टीवार

अभिनंदन महाराष्ट्र सरकार,भ्रष्टाचारात जोरदार प्रगती -विजय वडेट्टीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकताच एनसीआरबी म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो जी गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे.या संस्थेने देशभरातील भ्रष्टाचाराचा अहवाल जाहीर केला आहे.यात महाराष्ट्र राज्य देशात भ्रष्टाचारात अव्वल स्थानावर असल्याने काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज,शुक्रवार ३ ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधत उपरोधिक टोला लगावला आहे.महाराष्ट्राचा पारदर्शक कारभार एवढा चकचकीत आहे की,देशात महाराष्ट्राने भ्रष्टाचारात शिखर गाठले आहे.देशात भ्रष्टाचार कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध उपाययोजना करत असतांना भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढतच आहे. २०२३ मध्येही महाराष्ट्र भ्रष्टाचारात अव्वल ठरला असल्याचे एनसीआरबी अहवालातून समोर आले आहे.२०२३ मध्ये देशभरात भ्रष्टाचाराची १ हजार १३९ प्रकरणे समोर आली.त्यातील तब्बल ७६३ प्रकरणे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.या यादीत उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.एनसीआरबी अहवालानुसार देशात भ्रष्टाचारात महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे आणि ते देखील सलग तीन वर्ष ही कामगिरी महाराष्ट्राने केली आहे.म्हणजे उत्तर प्रदेशला पण महाराष्ट्राने मागे टाकले आहे.स्वच्छ आणि पारदर्शक कामाचा ढोल बजावणाऱ्यांना त्यांच्या कारभाराचे सरकारी प्रमाणपत्र मिळाले आहे.त्यामुळे अभिनंदन महाराष्ट्र सरकार,जोरदार प्रगती,असे म्हणत वडेट्टीवारांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!