Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूर३० हजारासाठी अडकला भ्रष्टाचाराच्या सापळ्यात..!

३० हजारासाठी अडकला भ्रष्टाचाराच्या सापळ्यात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या पुर्नपडताळणी अहवालासाठी ३० हजाराची लाच घेणारा चंद्रपूर जिल्हा पुर्नवसन कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी आज,रविवार २८ सप्टेंबर रोजी एसीबीच्या जाळ्यात अडकला.नरेंद्र विठोबाजी खांडेकर असे लाच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.खांडेकर याने सुरुवातीला तक्रारदारास २ लाख रुपयांची मागणी केली होती.एवढी रक्कम देणे शक्य नसल्याने तडजोड करण्यात आली.त्यानुसार जुलै २०२५ मध्ये तक्रारदारांनी १ लाख रुपये दिले होते,तर उर्वरित ३० हजार रुपये अहवाल पाठवितांना देण्याचे ठरले होते.तत्पूर्वी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.तक्रार प्राप्त होताच पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली व आज रविवारी सापळा रचून खांडेकर यांनी ३० हजाराची लाच स्वीकारताच रंगेहाथ अटक करण्यात आली.यातील तक्रारदार हे प्रकल्पग्रस्त असून चंद्रपूरचे रहिवासी आहेत.तक्रारदार यांच्या मुलीची प्रकल्पग्रस्त राखीव जागेतून निवड झाल्याने नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या पुर्नपडताळणी अहवालासाठी खांडेकर यांनी लाचेची मागणी केली होती.पहिल्यांदा १ लाख रुपये देऊनही पैश्याची हाव सुटलेली नसल्याने दुसऱ्या वेळेस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा झटका देण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!