Wednesday, July 29, 2026
Homeकुरखेडा१७ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरीच घेतला गळफास.. - कुरखेडा तालुक्यातील घटना..

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरीच घेतला गळफास.. – कुरखेडा तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-१७ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरी कुणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कुरखेडा तालुक्याच्या वडेगाव येथे उघडकीस आली आहे.१७ वर्षीय चैताली प्रल्हाद बोरकर, रा.वडेगाव,ता.कुरखेडा,जि.गडचिरोली असे आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलीचे नाव असून ती कुरखेडा शहराच्या विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकत होती.
घटनेच्या दिवशी चैताली ही एकटीच घरी होती. कुटूंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते.अश्यातच काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास घरी कुणीही नसल्याचे पाहून तिने घराला लागूनच असलेल्या जुन्या घरातील आड्याला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. सदरची घटना दुपारी १२ च्या दरम्यान घडली.गावातील नागरिकांना माहिती होताच घटनास्थळी धाव घेत तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.लागलीच कुटुंबीयांनी चैतालीला फासावरून खाली उतरवत तात्काळ कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात नेले.मात्र,तत्पूर्वीच चैतालीने प्राण सोडला असल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला असून १७ वर्षीय चैतालीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले? त्या दिशेने कुरखेडा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; जहाल नक्षलवादी सुरक्षा दलांच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नक्षल चळवळीतील शेवटचा सक्रिय सर्वोच्च नेता मिसिर बेसरा याची झारखंडच्या सारंडा जंगलात अन्नावाचून कोंडी झाल्याने मोजक्या नक्षलवाद्यांसह जंगलात भटकत असतांनाच त्याच्या अंगरक्षकासह...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!