Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी.. - वय झालेल्या तरुणांनाही मिळणार...

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी.. – वय झालेल्या तरुणांनाही मिळणार संधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून मागील महिन्याच्या २० ऑगस्ट रोजी  राज्यातील पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई  भरती बाबत शासन निर्णय जारी करण्यात आला होता.त्यानुसार पोलिस शिपाई-१२ हजार ३९९ पदे,पोलिस शिपाई चालक-२३४ पदे,बॅण्डस्मन-२५ पदे,सशस्त्र पोलिस शिपाई-२ हजार ३९३ पदे आणि कारागृह शिपाई-५८० पदे,असे एकूण १५ हजार ६३१ पदांच्या भरतीला शासनाच्या वतीने हिरवा कंदील देण्यात आला आहे.राज्यातील पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान रिक्त झालेली पदे शंभर टक्के भरण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. पोलिस भरती प्रकियेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता ४५० रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपये इतके परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे.अश्यात आता परत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.पोलीस भरतीमध्ये सन २०२२ ते २०२५ या चार वर्षात वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक वेळची संधी देण्यात येत आहे.विशेष म्हणजे,या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.याबाबतचा शासन निर्णय तीन दिवसांपूर्वी बुधवारी १० सप्टेंबरला गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे.त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आणि वय झालेल्यांना तरुणांनाही संधी मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!