- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-१७ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरी कुणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कुरखेडा तालुक्याच्या वडेगाव येथे उघडकीस आली आहे.१७ वर्षीय चैताली प्रल्हाद बोरकर, रा.वडेगाव,ता.कुरखेडा,जि.गडचिरोली असे आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलीचे नाव असून ती कुरखेडा शहराच्या विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकत होती.
घटनेच्या दिवशी चैताली ही एकटीच घरी होती. कुटूंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते.अश्यातच काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास घरी कुणीही नसल्याचे पाहून तिने घराला लागूनच असलेल्या जुन्या घरातील आड्याला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. सदरची घटना दुपारी १२ च्या दरम्यान घडली.गावातील नागरिकांना माहिती होताच घटनास्थळी धाव घेत तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.लागलीच कुटुंबीयांनी चैतालीला फासावरून खाली उतरवत तात्काळ कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात नेले.मात्र,तत्पूर्वीच चैतालीने प्राण सोडला असल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला असून १७ वर्षीय चैतालीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले? त्या दिशेने कुरखेडा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
- Advertisement -

