Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नवीन प्रवेशीत प्रशिक्षणार्थींना विशेष मार्गदर्शन कार्यक्रम..

देसाईगंजच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नवीन प्रवेशीत प्रशिक्षणार्थींना विशेष मार्गदर्शन कार्यक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या इंदूताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी एस.एस.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दिन व मागील महिन्याच्या ऑगस्टमध्ये संस्थेत प्रवेश घेतलेल्या नवीन प्रवेशीत प्रशिक्षणार्थींचा विशेष मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम एनएसएस समन्वयक वृक्षप्रेमी सी.एम.गरमळे व स्वयंसेवक यांनी तयार केलेली औषधी वनस्पती नागवेली वृक्ष संस्थेतील सर्व शिल्प निदेशक,गटनिदेशक, प्राचार्य यांना भेट देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर जे.टी.काटकर शिल्प निदेशक प्लंबर यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील “शिस्त,सवयी,विद्यावेतन” या विषयावर सखोल माहिती दिली.बी.बी.घरडे शिल्प निदेशक मेकॅनिकल डिझेल(mech.Diseal)यांनी “आयटीआय केल्यानंतर”शासकीय नोकरी,स्वयंरोजगार व खासगी कंपन्यांनामध्ये नोकरीच्या संधी” या विषयावर सखोल अशी माहिती दिली.आर.बी.भोयर शिल्प निदेशक यांनी भौतिक सुविधा या विषयावर सखोल माहिती दिली.तर के.वाय.डाबरे गटनिदेशक यांनी आयटीआय मध्ये नवीन प्रवेशीत प्रशिक्षणार्थी यांना विशेष मार्गदर्शन केले.त्यानंतर प्रथम वर्ष व द्वितीय वर्षांमधील आयटीआय प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली.प्रा.एस.एस.चौधरी यांनी अध्यक्षीय भाषण केले. तर सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक सी.एम.गरमळे यांनी केले.सूत्रसंचालन कु.प्रतीक्षा साहारे तर आभार प्रदर्शन व्ही.वाय.नागमोती,एनएसएस सहसमन्वयक यांनी केले. सदर कार्यक्रमास श्रीमती जाधव गटनिदेशक,ए.व्हि. तिजारे,सी.डी.समर्थ,डी.जी.आवादे,एम.बी मेश्राम, आर.सी.निखाळे,बी.एन.नैताम,टी.यू सोयाम,कु. एम.सी.चौदंते,कु.वाय.एस.बरकले सर्व कर्मचारीवृंद तथा तासिका शिल्प निदेशक,एनएसएस स्वयंसेवक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!