Tuesday, September 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपावसाचा जोर वाढणार; पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा..

पावसाचा जोर वाढणार; पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एकदा पाऊस सुरू झाला की, थांबण्याचे नावच घेत नाही.राज्यातील विविध जिल्ह्यात कमी अधिक पाऊस कोसळत आहे.अश्यातच आता पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.आज,बुधवार ३ सप्टेंबर रोजी राज्यातील विविध जिल्ह्यात दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावत सायंकाळच्या सुमारास विश्रांती घेतली.शेतीसाठी पाऊस चांगला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.मात्र,शेतात पुराचा तडाखा बसला तर संपूर्ण धानपीक नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे आतातरी अस्मानी संकट ओढवू नये,अशी अपेक्षा शेतकरी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.त्यातच आज,बुधवार ३ सप्टेंबरपासून पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.दरम्यान,मुंबई,ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या तिन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.तर रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.पुणे जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.तसेच पुणे घाटमाथा,सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर परिसरात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगली,सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.धुळे,नंदुरबार,नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे.अकोला,नागपूर,चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा, वर्धा, बुलढाणा,गोंदिया,यवतमाळ,वाशिम,छत्रपती संभाजीनगर,परभणी,जालना,बीड,नांदेड,हिंगोली जिल्ह्यांत वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून यलो अलर्ट दिला आहे.तर जळगाव जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा जोर असल्याने ऑरेंज अलर्ट  जारी करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!