Thursday, May 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसरकारची डोकेदुखी वाढणार; येत्या शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण..

सरकारची डोकेदुखी वाढणार; येत्या शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील  येत्या,शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणावर बसणार असल्याने सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज,सोमवार २५ ऑगस्ट रोजी जालना येथील
आयोजित एका पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की,येत्या,बुधवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून निघून त्याच दिवशी जुन्नर येथील शिवनेरी गडावर पोहचून दुसऱ्या दिवशी गुरुवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडावरील पवित्र माती कपाळावर लावून राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जाऊ.तेथून तळेगाव,लोणावळा,पणवेल, वाशी,चेंबूर मार्गे २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी आपण आझाद मैदानाला पोहोचणार आहोत.त्यानंतर शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी सकाळपासून आपले आझाद मैदानावर उपोषण सुरू होईल.मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही अनेकदा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण केले असून त्यांच्यासाठी लाखो मराठा बांधव पुढे सरसावले आहेत.अश्यातच आता मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण असल्याने मराठा आरक्षणावर सरकार काय भूमिका घेते,याकडे सर्वांच्या नजरा भिडलेल्या असतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!