- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-पती सोबत आई-वडिलांच्या घरी गेलेल्या महिलेने गावी परत येत असतांना कामठी तालुक्याच्या नेरी शिवारातील कन्हान नदीच्या पुलावर देवपूजेची फुले,पाने,हार व इतर साहित्य पाण्यात वाहण्यासाठी थांबले असताच पतीला काही कळण्याच्या आत पत्नीने नदीत उडी घेतली अन् क्षणात दिसेनाशी झाली.पतीने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक गोळा झाले.५३ वर्षीय कल्पना बंडू येरणे रा.न्यू प्रजापतीनगर, नागपूर असे नदीत उडी मारणाऱ्या महिलेचे नाव आहे.
कल्पना व तिचे ५७ वर्षीय पती बंडू पांडुरंग येरणे यांच्यासोबत तिच्या माहेरी गेली होती.मौदा तालुक्यातील अरोली (कोदामेंढी) तिचे माहेरघर असून पती-पत्नी दोघेही काल शुक्रवारी दुपारी एमएच ४९ बीजी ८६९२ क्रमांकाच्या दुचाकीने अरोलीहून नागपूरला यायला निघाले.दोघेही नेरी शिवारात आल्यावर निर्माल्य विसर्जित(देवपूजेची फुले,पाने,हार पाण्यात सोडणे) करण्यासाठी बंडू यांनी दुचाकी कन्हान नदीच्या पुलावर रोडलगत उभी केली व दोघेही वाहनावरून खाली उतरले.कल्पनाने चप्पल दुचाकीजवळ काढल्या व निर्माल्य पाण्यात टाकण्यासाठी पुलाच्या संरक्षक भिंतीवर चढली.काही कळण्याच्या आत तिने नदीत उडी घेतली.हा प्रकार लक्षात येताच बंडू यांनी आरडाओरड केल्याने नागरिक गोळा झाले.माहिती मिळताच कामठी (नवीन) पोलिसांसह शोधपथक घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी कल्पनाचा नदीच्या पात्रात शोध घेतला. मात्र,सायंकाळपर्यंत तिचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता.अंधारामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली.परत आज,शनिवार २३ ऑगस्ट रोजी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.नदी दुथडी भरून वाहत असल्याने मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- चर्चांना उधाण 👇
कल्पनाने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने कन्हान नदीत उडी घेतली कीती तोल गेल्याने नदीत पडली? असा प्रश्न घर करून सोडतो आहे.विशेष म्हणजे, पुलाची सुरक्षा भिंत फारशी उंच नाही.त्यामुळे भिंतीवर न चढता पात्रात निर्माल्य सहज टाकता आले असते. ती निर्माल्य टाकण्यासाठी पुलाच्या भिंतीवर का चढली? त्यातच दुचाकीजवळ हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्यांचे तुकडे पडून आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
- Advertisement -

