- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-सध्याच्या घडीला मतचोरी बद्दल सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आवाज उठविण्यात येत आहे. सर्वजण आपापल्या पद्धतीने मुद्दा उचलून धरत असल्याचे दिसून येत आहेत.कुणी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तर कुणी इंस्टाग्राम वा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेची तोफ डागू लागलेत.अश्यातच आज,शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी ‘एक्स'(ट्विटर)वर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी तेजस्वी यादव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस)१९६ (१) (अ),१९६ (१)(ब),३५६ (२), ३५६ (३),३५२,३५३ (२) अन्वये गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.तेजस्वी यादव यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे.बिहार राज्याच्या गया येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा होता.तत्पूर्वी तेजस्वी यादव यांनी पंतप्रधानांबाबत ‘एक्स’ वर पोस्ट टाकली. सदरची पोस्ट ही आक्षेपार्ह असून,त्यात शांतता भंग होऊन समाजात तेढ निर्माण होऊन पोस्टमुळे पंतप्रधानांची बदनामी झाल्याचा आरोप गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी केला आहे.देशात धार्मिक,सामाजिक सलोखा आणि बंधुभाव टिकून राहावा म्हणून आपण सातत्याने प्रयत्नशील असतो.परंतु,काही व्यक्ती आपल्या राजकीय स्वार्थासाठी समाजात तेढ निर्माण करत आहेत.याचे परिणाम सामान्य जनतेच्या सुरक्षेवर होऊ शकतात.त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करावी,अशी मागणी आमदार नरोटे यांनी केली आहे.प्रकरणी आज शुक्रवारी नरोटे यांनी तेजस्वी यादव यांचे विरोधात गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.विशेष म्हणजे,प्रकरण बिहारचे अन् तक्रार गडचिरोलीत झाल्याने अचंभित करणारी घटना उघडकीस आली आहे.
- Advertisement -

