Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीयेत्या १ सप्टेंबर रोजी अनुकंपा मेळाव्याचे आयोजन; २८६ उमेदवारांची सामाईक प्रतीक्षा यादी...

येत्या १ सप्टेंबर रोजी अनुकंपा मेळाव्याचे आयोजन; २८६ उमेदवारांची सामाईक प्रतीक्षा यादी तयार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या,१ सप्टेंबर २०२५ रोजी अनुकंपा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात पोलिस विभागासह राज्य शासनाच्या एकूण ५१ विभागांचा समावेश करण्यात आला असून,संबंधित विभागातील अर्ज व प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयात विचारासाठी सादर केली जाणार आहेत.या अनुकंपा मेळाव्यात ‘क’ वर्ग पदांवरील प्रकरणांचा विचार केला जाणार आहे. शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत हा मेळावा आयोजित करण्यात आला असून नियुक्ती प्राधिकार्‍यांनी सुचविलेल्या रिक्त पदांची यादी आज,शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.
१ सप्टेंबर रोजी आयोजित अनुकंपा मेळाव्यात उमेदवारांचे समुपदेशन करून संबंधित विभागांना नियुक्तीकरिता शिफारस करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात एकूण २८६ उमेदवारांची सामाईक प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. दरम्यान,विविध १३ विभागांकडून ५३ पदांची मागणी प्राप्त झाली असून,त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना नियुक्तीची संधी मिळणार आहे.अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेतील प्रलंबित प्रकरणांचे त्वरित निवारण करून पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचा  प्रशासनाचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!