Tuesday, August 25, 2026
Homeभंडाराचक्क दुसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर केले विष प्राशन.. - बँक...

चक्क दुसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर केले विष प्राशन.. – बँक मॅनेजरने खातेधारकाची रक्कम हडपल्याचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-नुकताच भंडारा शहरातील गोल्ड लोन बाबतचा प्रकरण १८ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अश्यातच आता आपली रक्कम लवकरात-लवकर परत मिळावी,यासाठी बँक खातेधारकाच्या वडिलांनी दुसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना उघडकीस आली आहे.काल गुरुवारी दुपारच्या सुमारास,जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन अमित जोशी यांनी पोलिस अधीक्षकांना भेटण्याचा प्रयत्न केला.पोलीस अधीक्षक बाहेर कामानिमित्त गेले असल्याने भेट होऊ शकली नाही. यादरम्यान,त्यांनी सोबत आणलेले वीष प्राशन केले. सदरची बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच, लागचीच जोशी यांना तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले.सध्या अमित जोशी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.आपणास हे कृत्य करण्यासाठी एका व्यक्तीने प्रोत्साहित केले,असे केल्यास रक्कम लवकर परत मिळेल,असे सांगण्यात आल्याचे अमित जोशी यांनी भंडारा पोलिसांना दिलेल्या बयानात नमूद केल्याने एकच खळबळ उडाली आहे.प्रकरणी विष प्राशन करण्यास परावृत्त करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
  •  नेमके प्रकरण काय?👇
भंडारा शहराच्या गांधी चौक या ठिकाणी मनप्पुरम गोल्ड लोन नावाची बँक आहे.सदर बँकेकडून सोने गहाण ठेवून कर्ज स्वरूपात रक्कम दिली जाते.त्यामुळे हिमांशू अमित जोशी यांना वडिलांच्या आजारपणामुळे पैशाची गरज होती.हिमांशू हे मनप्पुरम गोल्ड लोन बँकेचे खाते धारक आहेत.पैश्याची गरज असल्याने हिमांशू यांनी गोल्ड लोन बँकेमध्ये १९ जुलै २०२५ रोजी तब्बल २९२ ग्राम सोने गहाण ठेवले होते.या बदल्यात हिमांशू यांच्या युको बँकेच्या बचत खात्यात १८ लाख ७२ हजार रुपयांची रक्कम जमा झाली.मात्र,काही अपरिहार्य कारणांमुळे हिमांशू यांच्या वडिलांची शस्त्रक्रिया महिनाभर लांबली.त्यामुळे गोल्ड लोनची ही रक्कम त्यांच्या खात्यात तशीच पडून राहिली.पैशाची गरज नसल्याने खात्यावर जमा असलेली रक्कम परत करण्यासाठी हिमांशू मनप्पुरम गोल्ड लोन बँकेत गेले.बँक व्यवस्थापक रोहित साहू यांनी गोल्ड लोन खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी दोन कोरे धनादेश घेतले आणि सध्या सर्व्हर डाऊन आहे,दोन दिवसांत रक्कम खात्यात आल्यावर सोने परत घेऊन जाल,असे सांगितले.हिमांशू जोशी यांनी मनप्पुरम गोल्ड लोन बँकेत सोने गहाण ठेवले होते.मात्र, व्यवस्थापक साहू याने त्या सोन्यापैकी ३४ ग्राम सोने मनप्पुरममधून काढून अन्य बँकेत स्वतःच्या नावाने गहाण ठेवल्याचाही प्रकार उघडकीला आला.
हिमांशू जोशी यांनी बँक व्यवस्थापक रोहित साहू याला जे दोन कोरे धनादेश दिले होते,त्याआधारे साहू याने त्याच्या पत्नीच्या खात्यावर अनुक्रमे १६ लाख ८१ हजार ८०० व २५ हजार रुपये,असे एकूण १७ लाख ७६ हजार ८०० रुपयांची रक्कम वळती केली. आरटीजीएसच्या सहाय्याने रक्कम वळविल्याचे स्टेटमेंटमध्ये उघडकीस आली आहे.अश्यातच हिमांशूच्या वडिलांनी बँक मॅनेजर रोहित साहू याला फोन केला असता त्याने, ‘मी माझी लाइफ सेट केली, पैसे देणार नाही,असे उत्तर दिल्याने अमीत जोशी यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!