Monday, May 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनिवडणूक आयोगाने राज्यातील ९ राजकीय पक्षांची नोंदणी केली रद्द..

निवडणूक आयोगाने राज्यातील ९ राजकीय पक्षांची नोंदणी केली रद्द..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-भारत निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांवर मोठी कारवाई करत देशातील तब्बल ३३४ नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द केली असून यात ३३४ मध्ये महाराष्ट्र राज्यातील ९ राजकीय पक्षांचा समावेश आहे.भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील अवामी विकास पार्टी,बहुजन रयत पार्टी,भारतीय संग्राम परिषद,इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया,नव भारत डेमोक्रॅटिक पार्टी,नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी, पिपल्स गार्डियन,दि लोक पार्टी ऑफ इंडिया आणि युवा शक्ती संघटना या नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाची नोंदणी रद्द केली आहे.सध्या देशात ६ राष्ट्रीय पक्ष,६७ प्रादेशिक पक्ष आणि २८५४ नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष (RUPPs) आहेत. लोकप्रतिनिधित्व कायदा,१९५१ च्या कलम २९अ अंतर्गत नोंदणी करतांना पक्षांनी नाव,पत्ता,पदाधिकारी यांची माहिती द्यावी लागते,तसेच सहा वर्षे सलग निवडणूक न लढवल्यास नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आयोगाकडे आहे.जून २०२५ मध्ये आयोगाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना ३४५ RUPPs म्हणजेच नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते.तपासणीदरम्यान संबंधित पक्षांना नोटिसा देऊन प्रत्यक्ष सुनावणीची संधी देण्यात आली.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार,३३४ पक्षांनी आवश्यक अटींचे पालन केले नाही.उर्वरित प्रकरणे पुनर्पडताळणीसाठी परत पाठवण्यात आली आहेत.रद्द करण्यात आलेल्या पक्षांना आता लोकप्रतिनिधित्व कायदा,१९५१ मधील कलम २९ब आणि २९क तसेच आयकर कायदा,१९६१ व निवडणूक चिन्ह आदेश,१९६८ अंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही.तसेच आयोगाच्या आदेशाविरोधात ३० दिवसांच्या आत अपील करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.तपशीलवार यादीसाठी https://www.eci.gov.in/list-of-political-parties या आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी,असे आयोगाने कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!