Wednesday, July 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'गाव करी ते राव न करी'.. महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी चक्क सिम...

‘गाव करी ते राव न करी’.. महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी चक्क सिम कार्डची सेवाच बदलली..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील ३६ वर्षीय महादेवी उर्फ माधुरी हत्तीण ग्रामस्थांच्या आणि तेथील मठाचा काळीज होती.हत्तीण नांदणी गावातच लहानाची मोठी झाली.अश्यातच,ज्या ठिकाणी ती लहानाची मोठी त्या ठिकाणाहून विविध कारणे पुढे करून तिला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात हलविण्यात आले.त्यामुळे गावकऱ्यांनी विरोध दर्शवित पोलिसांवर दगडफेक,आंदोलने व तीव्र निषेध केला.त्यातच आता वनतारा प्राणी संवर्धन केंद्र हा मुकेश अंबानी ग्रुपचा असल्याने हत्तिणीला वनतारामध्ये हलवल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर, सांगली,बेळगावसह कर्नाटकच्या सीमाभागात ‘जिओ’ सिम पोर्ट(नंबर तोच,मात्र कंपनी वेगळी) करण्याची लाट उसळली असून,यात २५ हजारांवर ग्राहकांनी कंपनीच्या सेवेला ‘जय हिंद जय भारत’ केले.विशेष म्हणजे,या बायकॉट मोहिमेत राजकीय नेत्यांनीही सहभाग घेतला.आमदार राहुल आवाडे यांनी स्वतःचा ‘जिओ’ सिमकार्ड नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करून घेतला.अश्यातच,सोशल मीडियावर जिओ सिम तोडण्याचे व पोर्ट करण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.त्यातच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत चक्क रोवणी करणाऱ्या महिला मजुरांनिही घरच्यांच्या ‘जिओ’ सिमकार्डची सेवा बदलल्याचे दिसून येते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!