- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात मोठ्या धुमधडाक्यात ‘आनंदाचा शिधा’ किटचे वितरण पहिल्यांदा दिवाळीला २०२२ मध्ये करण्यात आले होते.गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,गौरी-गणपती आणि दिवाळी या सणांच्या निमित्ताने,तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सरकारने ‘आनंदाचा शिधा’ किटचे वितरण केले होते.आनंदाचा शिधा योजनेंतर्गत राज्यातील गोर गरिबांना सणासुदीच्या काळात केवळ शंभर रुपयांमध्ये चार वस्तू मिळत होत्या.यात एक किलो रवा,एक किलो चना डाळ,एक किलो साखर आणि एक लीटर पामतेल देण्यात येत होते.अश्यातच आता लाडकी बहीण योजनेमुळे गोरगरिबांना सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटी रुपये लागतात,तर शिवभोजन थाळी साठी वर्षाला १४० कोटी रुपये तर आनंदचा शिधा साठी ५५० कोटी रुपये लागत होते. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरील वाढते ताण बघता निधी उपलब्ध होईल तशी योजना चालवत राहू,असेही मंत्री भुजबळ म्हणाले.त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही.
- Advertisement -

