Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीयुवक-युवतींसाठी विविध निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन.. - स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची...

युवक-युवतींसाठी विविध निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन.. – स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची सुवर्णसंधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी(अमृत)आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ‘अमृत’ लक्षित गटातील युवक-युवतींसाठी विविध निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी,के.पी.टाकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अमृत’ लक्षित गटातील उमेदवारांसाठी चार प्रकारचे निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत,ज्यांचा कालावधी १८ दिवसांचा असेल:
अमृत सूर्यमित्र (सौर): सौर ऊर्जा क्षेत्रातील कौशल्यांवर आधारित.
अमृत-बेकरी: बेकरी उत्पादनांच्या निर्मिती आणि व्यवस्थापनावर केंद्रित.
अमृत-आयात निर्यात: आंतरराष्ट्रीय व्यापार आणि निर्यात प्रक्रियेचे ज्ञान.
अमृत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण (REDP): उद्योजकतेच्या सर्व पैलूंवर व्यापक मार्गदर्शन.
याशिवाय,तीन प्रकारचे अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम देखील उपलब्ध असतील:
अमृत-उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम: २१ दिवसांचा कालावधी.
अमृत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम: ३० दिवसांचा कालावधी, संबंधित व्यवसायाच्या तांत्रिक प्रात्यक्षिकांवर विशेष भर.
अमृत क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम: ०६ दिवसांचा कालावधी.
या सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये तांत्रिक बाबींवरील प्रात्यक्षिकांसोबतच उद्योजकीय मार्गदर्शन,व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक,व्यवस्थापकीय आणि कायदेशीर माहिती,प्रभावी मार्केटिंग कौशल्ये, ग्राहकांशी संबंध निर्माण करून बाजारात व्यवसाय वाढवण्याचे तंत्र,शासनाच्या विविध योजना,बँकिंग प्रक्रिया,प्रकल्प अहवाल तयार करणे,उद्योगासाठी आवश्यक कागदपत्रे,उद्योजकीय मानसिकता आणि गुणसंपदा यांसारख्या विविध विषयांवर तज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर,व्यवसाय उभारणीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे पाठपुरावा केला जाईल आणि प्रशिक्षणार्थींना व्यवसाय सुरू करेपर्यंत मोफत मार्गदर्शन उपलब्ध असेल,असेही टाकळे यांनी नमूद केले.
  • पात्रता आणि अर्ज प्रक्रिया👇
‘अमृत’ लक्षित गटातील किमान ८ वी पास असलेले आणि कोणत्याही शासकीय कागदपत्रांवर जातीचा उल्लेख तसेच तहसीलदार यांचा रहिवाशी आणि उत्पन्न दाखला असलेले सर्व इच्छुक युवक-युवती या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.MCED द्वारे जिल्हा उद्योग केंद्र,कॉम्प्लेक्स एरिया,MIDC रोड, गडचिरोली येथे सध्या निवड प्रक्रिया सुरू आहे.पात्र लाभार्थींची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
इच्छुक उमेदवारांनी ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
के.पी.टाकळे (प्रकल्प अधिकारी,MCED गडचिरोली): मो.९१६८६६७१८१
विक्रांत पांडे (अमृत जिल्हा व्यवस्थापक,गडचिरोली): मो.९८३४३२३७२७
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नागपूर विभागाचे विभागीय अधिकारी हेमंत वाघमारे यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक,युवती, उद्योजक आणि नवउद्योजकांनी या निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!