Tuesday, August 25, 2026
Homeचंद्रपूर१९ वर्षीय तरुणाकडे आढळली तलवार; चमकदार तलवार जप्त..!

१९ वर्षीय तरुणाकडे आढळली तलवार; चमकदार तलवार जप्त..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत विना परवाना हत्यार बाळगणे गुन्हा असूनही काहीजण याचे उल्लंघन करतांना दिसून येतात.नुकतेच  गुन्हेगारीच्या खाईत जाता-जाता दोन तरणेबान युवक चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती गवसले.चंद्रपूरचे पथक शनिवार १९ जुलै रोजी ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहितीच्या आधारे ब्रम्हपुरी तालुक्याच्या किन्ही गावातील संशयितांच्या घरी पंचासमक्ष छापा टाकला आणि झाडाझडती घेतली असता एक नग देशी बनावटीचा गावठी कट्टा व दोन नग काडतूस अवैधरित्या मिळून आले.प्रकरणी दोन युवकांना अटक करण्यात आली. सदरची घटना ताजी असतांनाच आता परत चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा शहरातील एका १९ वर्षीय तरुणाकडे तलवार आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली.प्रकरणी अकिब नासिर खान वय १९ वर्षे,रा.चुनाभट्टी वार्ड,राजुरा,जि.चंद्रपूर यांस राजुरा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ८१ सेंमी लांबीची लोखंडी चमकदार तलवार जप्त केली आहे. आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन राजुरा येथे अपराध क्रमांक-३४६/२०२५ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!