Wednesday, September 2, 2026
Homeमुंबईमहसूल विभागातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकसेवा आयोगाकडून पदोन्नती..

महसूल विभागातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकसेवा आयोगाकडून पदोन्नती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्याच्या महसूल विभागातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकसेवा आयोगाकडून(MPSC) पदोन्नती देण्यात आली आहे.त्यानुसार राज्याच्या महसूल सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांना आज,सोमवार १४ जुलै रोजी आयएएस(IAS)कॅडरचा दर्जा देण्यात आल्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे.यात विजयसिंह देशमुख,विजय भाकरे,त्रिगुण कुलकर्णी,गजानन पाटील,महेश पाटील,पंकज देवरे,मंजिरी मनोलकर,आशा पठाण,राजलक्ष्मी शहा,सोनाली मुळे,गजेंद्र बावणे व प्रतिभा इंगळे यांचा समावेश आहे.केंद्र सरकारच्या पर्सनल,पब्लिक ग्रीवन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.दरम्यान,१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील रिक्त असलेल्या जागांवर पदोन्नती दिलेल्या १२ नवीन आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.यासंदर्भात,राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय सेवेत पदोन्नती मिळालेल्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.महसूल विभाग हा महाराष्ट्राचा प्रशासकीय कणा आहे; म्हणून या अधिकाऱ्यांनी आता आपली संपूर्ण क्षमता महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोगी आणावी अशी सदिच्छा व्यक्त करतो,असेही बावनकुळे यांनी या पदोन्नतीनंतर ट्विट करत म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!