Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीकुरखेडाच्या सती नदीवरील पुल वाहतुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ४५ दिवसांचा अल्टीमेटम..

कुरखेडाच्या सती नदीवरील पुल वाहतुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ४५ दिवसांचा अल्टीमेटम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कुरखेडा येथे राष्ट्रीय महामार्गावरील सती नदीवरील पुलाची पाहणी करतांना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सदर पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला व्हावा,यासाठी ४५ दिवसांची अंतिम मुदत देण्यात येत असल्याचे संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना बजावून तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.जिल्हाधिकारी पंडा यांनी आज,सोमवार १४ जुलै कुरखेडा तालुक्याला भेट देऊन शासकीय यंत्रणेचा आढावा घेतला व विविध शासकीय प्रकल्प व योजनांची पाहणी केली.यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रशांत गड्डम, तहसीलदार राजकुमार धनबाते तसेच गटविकास अधिकारी,कृषी,आरोग्य व इतर विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाले काय? याबाबत विचारणा करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य,कृषी, बांधकाम आणि इतर सर्व यंत्रणेने तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.यासोबतच सातबारा जीवंत मोहिम,धरती आबा शिबिरे व वृक्षलागवड या कार्यक्रमांची कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या.तहसीलदार धनबाते यांनी कुरखेडा तालुक्यात अतीवृष्टीमुळे ४०७ शेतकऱ्यांचे १५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असल्याचे सांगून नुकसानीची पंचनामे प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यसाचे व पूरग्रस्तांना शासकीय मदतीसाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
  • कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट आणि विद्युतीकरणावर तातडीने काम करा👇
कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचीही जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली.येथील डायलिसिस युनिट त्वरीत सुरू करून गरजू रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले.तसेच याबाबत हिंद लॅब या कार्यकारी संस्थेकडे युनिट सुरू करण्यास होत असलेल्या विलंबाबाबत तक्रार नोंदविण्याचे सांगितले.उपजिल्हा रूग्णालयातील अपूर्ण असलेल्या विद्युतीकरणाचे कामही तात्काळ पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
  • मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा👇
मान्सून काळात जलसाठे,डबक्यांमुळे मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढत असल्याने आरोग्य विभागाला मलेरिया प्रतिबंधासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गेले.गावपातळीवर आरोग्य पथकांनी घर ते घर भेटी देऊन तापाचे रुग्ण शोधावेत,रक्त नमुने घ्यावेत व संशयित रुग्णांवर त्वरित उपचार करावेत.पुरप्रवण गावांमध्ये मलेरिया प्रतिबंधक औषधांची फवारणी, साठलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे आणि जनजागृती मोहिमा राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.बैठकीस महसूल,पोलीस,वन,आरोग्य,कृषी तसेच इतर संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!