Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तज्या कामगारांनी बोगस प्रमाणपत्रांसह कागदपत्रे जोडलीत; अश्यांवर होणार गुन्हे दाखल..

ज्या कामगारांनी बोगस प्रमाणपत्रांसह कागदपत्रे जोडलीत; अश्यांवर होणार गुन्हे दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ज्या कामगारांनी कामगार नोंदणीसाठी बोगस प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे जोडली आहेत, अश्यांची पडताळणी सुरू असून पडताळणीत सिद्ध झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध त्या-त्या तालुक्यातील पोलिस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.तसेच बनावट प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे तयार करून देणाऱ्यांवरसुद्धा कारवाई केली जाणार असल्याने बोगस कामगार नोंदणी करणाऱ्यांची मोठी फजिती होणार आहे.शासनाकडून कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.या योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता काही दलाल सक्रिय झाले आहेत.बनावट कागदपत्रांच्या आधारे बऱ्याच प्रमाणात कामगार नोंदणी केल्याचा प्रकार तक्रारीनंतर उघडकीस आला आहे.याची दखल घेत कामगार विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांच्या पथकांमार्फत गोंदिया जिल्ह्यात चौकशी सुरू केली आहे.तर गडचिरोली जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या पथकांमार्फत चौकशी सुरू आहे.महाराष्ट्र सरकारच्या इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभदेण्यासाठी नोंदणी सुरू आहे.कामगार कल्याण मंडळाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वे आणि शर्तीच्या अधीन राहून,९० किंवा त्याहून अधिक दिवस काम करणाऱ्या कामगारांची ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर, कामगारांना बांधकामाशी संबंधित सुरक्षा उपकरणे आणि घरगुती वस्तू,अपघात झाल्यास मोफत उपचार, विमा,त्यांच्या मुलांना शिक्षण आणि इतर सुविधांमध्ये कामगार विभागाकडून आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे.बांधकाम कामगार नोंदणीसाठी,नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया ‘कामगार कल्याण मंडळ’च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. मात्र,काही दलालांनी पैसे घेऊन कामगारांची बनावट कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडून नोंदणी करून दिल्याचे पुढे आल्याने पडताळणीचे काम सुरू आहे.पडताळणी प्रक्रिया पार पडताच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!