- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक येथील युवा कवी प्रभाकर देविदास दुर्गे यांनी नागपुरातील आयोजित कवी संमेलनात उत्कृष्ट कविता सादर करीत उपस्थितांची मने जिंकून एकप्रकारे जिल्ह्याचेच नाही तर गावाचे नाव गाजवले आहे.नुकतेच सलग दोन दिवस पार पडलेल्या ५ जुलै व ६ जुलै रोजी नागपुरातील आयोजित कवी संमेलनात मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,एक वृक्ष व पुस्तक देऊन दुर्गे यांचा सत्कार करण्यात आला.
आर्लियन के.ए.मराठी प्रेरणा समूह नागपूरद्वारे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तिसरे राज्यस्तरीय पर्यावरण विशेष कवी संमेलन शनिवार ५ जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते.त्यात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुका अंतर्गत येणाऱ्या अडपल्ली चक या छोट्याश्या गाव खेड्यातील युवा कवी प्रभाकर दुर्गे यांचा देखील सहभाग होता.त्यांना आर्लियन के.ए.मराठी प्रेरणा समूह नागपूर या संस्थेच्या वतीने दुर्गे यांचे वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदान पाहून साहित्य कलेच्या सन्मानार्थ संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध जेष्ठ साहित्यिका विजयाताई ब्राह्मणकर,वरिष्ठ उपसंपादक महाराष्ट्र टाईम्सचे योगेश बडे,आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक,सुप्रसिद्ध गझलकार हृदय चक्रधर तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,एक वृक्ष व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे रविवार ६ जुलै रोजी नागपूरच्या मानवटकर भवन,हिंगणा रोड,वानाडोंगरी येथे क्रांतीपर्व पुस्तक प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय आयोजित कवी संमेलनात देखील प्रभाकर दुर्गे हे निमंत्रित कवी म्हणून उपस्थित होते.त्यांनी पुलवामाच्या पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या घटनेवर आधारित अन्यायाचा प्रतिकार करणारी वास्तववादी कवितेतून विचारांची चळवळ मांडत उपस्थित मान्यवरांसहित, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व कवी,कवयित्रींचे मने जिंकली.त्यांचे सामाजिक चळवळीतील योगदान पाहून संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक,समीक्षक तथा फुले शाहू आंबेडकरी विचारवंत डॉ.मनोहर नाईक,ज्येष्ठ साहित्यिक व फुले शाहू आंबेडकरी विचारवंत प्रा.जावेद पाशा कुरेशी तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र,सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.त्यांच्या या घवघवीत सन्मानार्थ आप्तजन,साहित्यिक,सहकारी, मित्रपरिवारांसह गाववासीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.
- Advertisement -

