- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जमाना बदलत चाललाय.पूर्वी फक्त पुरुषांवर क्रिमिनलचा ठपका लागायचा.पण,आता काळानुरूप बदल होत महिलाही यात उंच भरारी घेऊ लागल्याच्या घटना राज्यासह इतर राज्यात उघडकीस येत आहेत. अश्याच प्रकारची घटना नुकतीच नागपुरात उघडकीस आली आहे.दोन मुली व एक मुलगा असलेल्या एका महिलेने प्रियकराच्या मदतीने चक्क पतीलाच संपवले.आश्चर्याची बाब म्हणजे पत्नी एवढ्यावरच थांबली नाही तर कुणालाही शंका येऊ नये यासाठी तिने पतीचा नैसर्गिकरीत्या मृत्यू झाल्याचा बनाव केला.पण पिएम रिपोर्ट(पोस्टमॉर्टेम अहवाल)येताच पत्नीच्या कुकर्माचा खुलासा झाला.सदरची घटना नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके वय ३८ वर्षे,साईनाथ सोसायटी,तरोडी खुर्द,वाठोडा असे मृताचे नाव आहे.तर आरोपींमध्ये ३० वर्षीय पत्नी दिशा चंद्रसेन रामटेके व २८ वर्षीय आसिफ राजा इस्लाम अन्सारी उर्फ राजा बाबू टायरवाला राजनगर,वाठोडा अशी दोघांची नावे आहेत.
चंद्रसेन रामटेके हे शुक्रवार ४ जुलै रोजी घरीच बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती पत्नी दिशाने घरा शेजारील नागरिकांनी दिली.शेजारील नागरिकांनी याची माहिती चंद्रसेन यांचे मोठे बंधू संजय रामटेके वय ५० वर्षे यांना दिली.त्यानुसार संजय रामटेके हे घरी पोहोचले व इतरांच्या मदतीने त्यांनी लहान भाऊ चंद्रसेन यांना मेडिकल रुग्णालयात नेले.मात्र,त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यानुसार वाठोडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. नातेवाइकांनादेखील चंद्रसेन यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने वगैरे झाल्याची शक्यता वाटली.मात्र,दुसऱ्या दिवशी शनिवारी ५ जुलैला शवविच्छेदन अहवाल आला आणि पोलीसही अवाक् झाले.शवविच्छेदन अहवालात चंद्रसेन यांचा मृत्यू गळा,नाक व तोंड दाबल्यामुळे स्पष्ट झाले.हत्येचे प्रकरण असल्याने पोलिसांनी तातडीने चौकशीला सुरुवात केली.पोलिसांना शंका आल्याने त्यांनी दिशाची सखोल चौकशी केली.चौकशीदरम्यान तिने हत्याची कबुली दिली.खुलास्यात तिचे आसिफसोबत अनैतिक संबंध होते.मात्र,याची माहिती चंद्रसेन यांना कळाली.त्यांनी दिशाला यावरून जाब विचारला व त्यांचे कडाक्याचे भांडण झाले.चंद्रसेन आपल्या मार्गात आडकाठी येऊ नये याकरीता दोघांनीही चंद्रसेन रामटेके यांना संपविण्याचा कट रचला. त्यानुसार शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दिशाने आरोपी आसिफला गुपचुप घरात घेतले. झोपलेल्या चंद्रसेन यांचा गळा आवळला व दोघांनीही त्यांच्या नाका-तोंडावर उशी दाबून ठेवली.जीव गुदमरल्याने चंद्रसेन यांचा तडफडून मृत्यू झाला.हत्येचा उलगडा झाल्याने संजय रामटेके यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
- सुरुवातीला मैत्री; नंतर प्रेम👇
तेरा वर्षांपूर्वी चंद्रसेन आणि दिशा यांचे लग्न झाले होते.त्यांना दोन मुली आणि सहा वर्षाचा मुलगा आहे. चंद्रसेनला काही वर्षापूर्वी अर्धांगवायूचा(लकवा) झटका बसला.त्यानंतर दिशाने स्वतःचा मिनरल वॉटर तयार करण्याचा प्लांट सुरू केला.त्यातून दररोज कॅन विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला.यादरम्यान वाठोड्यातील महामार्गावर असलेल्या राजा इस्लाम अन्सारी याच्याशी तिचे सूत जुळले.राजाचे पंक्चर दुरुस्तीचे दुकान होते.सुरुवातीला मैत्री झाली आणि त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.प्रेमात अडसर ठरल्याने दोघांनीही चंद्रसेन यांची हत्या केली.
- Advertisement -

