Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्याची तिजोरी लुटली जात आहे आणि प्रत्यक्ष लाभ दलालांनाच मिळतो- नाना पटोले...

राज्याची तिजोरी लुटली जात आहे आणि प्रत्यक्ष लाभ दलालांनाच मिळतो- नाना पटोले – धान्य खरेदी योजनेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा विधानसभेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त:-धान्य खरेदी योजनेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा परत पुन्हा आज,बुधवार २ जुलै रोजी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजला. यापूर्वीही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार नाना पटोले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उचलून धरत गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील राईस मिलर्स चालकांची नावे घेत कारवाईची मागणी केली होती.त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठ दिवसांत सर्वांचा माज उतरवतो,अश्या शब्दात सभागृहात ठणकावून सांगितले होते.अश्यातच आता आज बुधवारी परत पुन्हा नाना पटोले यांनी मुद्दा उपस्थित करत धान्य खरेदी योजना ही शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळावा, त्यांना न्याय मिळावा यासाठी सुरू करण्यात आली आहे. ही शेतकऱ्यांच्या हिताची योजना असली तरी प्रत्यक्षात दलालांच्या हातात ती खेळू लागली आहे.या योजनेंतर्गत सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे सरकारी तिजोरीला जबर नुकसान सहन करावे लागत आहे.सरकारच्या निधीवर उघडपणे डल्ला मारला जात आहे,राज्याची तिजोरी लुटली जात आहे आणि प्रत्यक्ष लाभ मात्र दलालांनाच मिळतो आहे.हा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे.मागील अधिवेशनातही मी हा मुद्दा सभागृहात मांडला होता.तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन या प्रश्नाचे निराकरण करण्याचे तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते.त्यामुळे याचा तातडीने निकाल लावणे अत्यावश्यक आहे.या दलालांवर नेमकी काय कारवाई करण्यात येणार आहे,याचे उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात द्यावे.असे नाना पटोले यांनी आज विधासभेत मुद्दा उचलून धरला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!