Sunday, May 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदुचाकी वाहनांसाठी मोठी बातमी.. आता दुचाकी वाहनांना दोन हेल्मेटची सक्ती..

दुचाकी वाहनांसाठी मोठी बातमी.. आता दुचाकी वाहनांना दोन हेल्मेटची सक्ती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दुचाकीने देशात दरवर्षी असंख्य अपघात होतात.अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागते.त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने दुचाकीस्वार आणि त्याच्या पाठीमागे
बसलेल्या प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने दुचाकी वाहनांसाठी एक नवा नियम लागू केला आहे.केंद्र सरकारने यापुढे दुचाकी वाहन उत्पादकांना वाहन विक्री करतांना खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे अनिवार्य करण्यात येणार आहे.यामुळे दुचाकीस्वार आणि त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे सक्तीचे होणार आहे.केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम,१९८९ मध्ये महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित केले आहेत.या नवीन अधिसूचनेनुसार,दुचाकी खरेदी करतांना दोन हेल्मेट देणे बंधनकारक केले जाईल.ही अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर तीन महिन्यांतच हा नवीन नियम लागू होईल.या बदलामुळे रस्त्यावर दुचाकी चालक आणि पाठीमागे बसलेल्या प्रवाशासाठीही हेल्मेट वापरणे अनिवार्य होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या हेल्मेट नियमासोबतच,१ जानेवारी २०२६ पासून नवीन एल-२ श्रेणीतील दुचाकी वाहनांना (ज्यांची इंजिन क्षमता ५० सीसीपेक्षा जास्त किंवा वेग ५० किमी/तासाहून अधिक आहे)अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) असणे अनिवार्य करण्यात आले आहे.यामुळे अपघातांमुळे होणारे मोठे नुकसान आणि जीवितहानी टाळता येईल,विशेषतः अचानक ब्रेक लावल्याने होणाऱ्या डोक्याच्या किंवा तोंडाच्या दुखापतींना प्रतिबंध बसेल. नवीन नियमांना अंतिम स्वरूप देण्यापूर्वी परिवहन मंत्रालयाने देशभरातील नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत.यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.दुचाकीस्वार आणि संबंधित व्यक्ती त्यांच्या सूचना comments-morth@gov.in या ईमेल आयडीवर पाठवू शकतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२४ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह; गडचिरोली शहरात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एका २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी...

आता कुरखेडा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना वेळेवर व दर्जेदार मिळणार उपचार.. “महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या “महाडायलिसिस-स्वस्थ आरोग्याची हमी” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले.या...

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!