Thursday, September 3, 2026
Homeगोंदियाविना परवाना वैनगंगा नदीतून रेतीची चोरी.. - आठ ट्रॅक्टरसह आठ आरोपींवर महसूल...

विना परवाना वैनगंगा नदीतून रेतीची चोरी.. – आठ ट्रॅक्टरसह आठ आरोपींवर महसूल विभागाची धडक कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :- ‘रेती चोरीचा मामला अन् हळूवार बोंबला’ करणाऱ्या आठ रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यात  तिरोडा महसूल प्रशासनास यश आले आहे.कारवाईत आठ ट्रॅक्टरसह आठ ब्रास रेती व आठ आरोपींना पकडण्यात आले असून आठही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.सदरची कारवाई तहसीलदार एम.एम.ठाकरे यांच्या  मार्गदर्शनात नायब तहसीलदार ए.पी.मोहनकर,मंडळ अधिकारी राजेश तांबुलकर,ग्राम महसूल अधिकारी अजय बिसेन,बी.के.पारधी यांनी केली आहे.
  • यांच्यावर झाली कारवाई👇
१.छोटू पटले रा.तिरोडा,२.विपिन रामेश्वर मिश्रा व चालक जयेंद्र मिश्रा रा.तिरोडा,३.रामकुमार रामेश्वर देशमुख रा.तिरोडा,४.गोरक्षनाथ हेमराज राणा रा. तिरोडा,५.शुभम अशोक सातपुते रा.अर्जुनी,६.नीलेश रविकांत चिचघरे रा.अर्जुनी,७.महेंद्र रामसिंग ठाकूर रा. अर्जुनी,८.महेंद्र देवीलाल चौधरी रा.अर्जुनी.
अवैधरीत्या विना परवाना वैनगंगा नदीतून रेतीची चोरी होत असल्याची गुपित माहिती तिरोडा महसूल प्रशासनास प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक पासची तपासणी केली असता वरील एकाही आरोपींकडे वाहतूक पास(रॉयल्टी) आढळून आली नाही.प्रकरणी आठ ब्रास रेती सह लाखो रुपयांचे ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!