Thursday, April 30, 2026
Homeजळगावमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर ओतले रॉकेल..

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर ओतले रॉकेल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
जळगाव :-एका व्यक्तीने चक्क अंगावर रॉकेल ओतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यामध्ये घुसून  आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज,शुक्रवार २० जून रोजी जळगवाच्या आकाशवाणी चौक परिसरात घडली.मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच व्यक्ती समोर आला आणि त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महदहनाचा प्रयत्न केला.पोलिसांनी वेळीच रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला.पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर असतांना सदरची घटना घडली.त्यांचा ताफा जळगाव शहरामध्ये दाखल होताच ताफ्यामध्ये घुसून एका व्यक्तीने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.संजय वराडे असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्याने संजय वराडे या ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला.घटनेमुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली.सदर घटनेनंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्यामुळे शहरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!