Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीआता आपत्ती व्यवस्थापनाची माहिती मिळणार व्हॉट्सअपवर..

आता आपत्ती व्यवस्थापनाची माहिती मिळणार व्हॉट्सअपवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित तातडीची,अचूक आणि अधिकृत माहिती नागरिक,अधिकारी व कर्मचारी यांना सहज मिळावी, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली यांच्यातर्फे आधुनिक चॅट बोट प्रणाली सुरु करण्यात आली असून या प्रणालीचा शुभारंभ आज,बुधवार १८ जून रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे,निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, सहाय्यक महसूल अधिकारी स्वप्नील माटे व पूर समन्वय अधिकारी गोपीचंद गव्हारे यांची उपस्थिती होती.
ही प्रणाली व्हॉट्सअपवर आधारित असून जिल्ह्यातील पर्जन्यमान,धरणांचा विसर्ग,नदीच्या पाणीपातळीची सद्यस्थिती,हवामान अंदाज,संपर्क तुटलेली गावे व शहरे,बंद रस्त्यांची यादी,प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना,विजेपासून बचावाच्या उपाययोजना आदी बाबतची अद्यावत व अधिकृत माहिती सहज मिळवता येईल.त्यासाठी नागरिकांनी 8275371485 हा क्रमांक DDMA Gadchiroli या नावाने मोबाईलमध्ये सेव्ह करावा व व्हॉट्सअपवर ‘Hi’ असा मॅसेज पाठवावा.त्यानंतर मिळालेल्या मेनूमधून हवी असलेली माहिती निवडता येते.QR कोड स्कॅन करूनही हा क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करता येतो.यासोबतच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनेलला https://whatsapp.com/channel/0029VbAPkzTKGGG8KdTvgY41 या लिंकवरून फॉलो करता येईल.आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक- 07132-222031 आणि 222035 तसेच मोबाईल क्रमांक 9423911077, 8275370508, 8275370208 वर संपर्क साधावा. पोलीस नियंत्रण कक्षासाठी 07132-223142, 223149 आणि मोबाईल क्रमांक 9403801322 हे संपर्क क्रमांक दिले आहेत.या प्रणालीचा अधिकाधिक नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!