Friday, September 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता वाहनचालकांसाठी फास्टॅग आधारित वार्षिक पास होणार सुरू..

आता वाहनचालकांसाठी फास्टॅग आधारित वार्षिक पास होणार सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-टोलनाक्यांवरील वेळ कमी करणे, वाहतूक कोंडीतून सुटका करणे आणि टोल प्लाझावरील वाद कमी करणे यासह लाखो खासगी वाहन मालकांना जलद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आता लवकरच वाहनचालकांसाठी फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू होणार आहे.या नव्या योजनेंतर्गत वाहनधारकांना तीन हजार रुपयात वर्षभर (२०० ट्रीप) टोलमुक्त प्रवास करता येणार आहे.सदरची योजना ही १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार असल्याचे केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज,बुधवार१८ जून रोजी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे फास्टॅग (FASTag)बद्धलची घोषणा केली आहे.सदरची पास केवळ गैर-व्यावसायिक खासगी वाहनांसाठी उपलब्ध असेल.पास सक्रिय केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० फेऱ्या पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल) वैध राहील.वार्षिक पासमुळे देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरून सहज आणि किफायतशीर प्रवास करता येईल,असे गडकरींनी म्हटले आहे.वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी एक स्वतंत्र लिंक लवकरच हायवे ट्रॅव्हल ॲप आणि NHAI/MORTH वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.नागरिक ही लिंक सुरू झाल्यानंतर या अधिकृत ॲपद्वारे पास ॲक्टिवेट करू शकतील.तसेच NHAI (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट्सवरूनही पास मिळवता येईल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!